• Mon. Aug 17th, 2026

Nitin Gadkari: लोक दोन्ही बाजूंनी तबला वाजवतात; मीडिया आणि इन्फ्लुएन्सर्सवर गडकरींची टिप्पणी, टीकेवर काय म्हणाले?

नागपूर : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मीडिया आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सच्या भूमिकेवर मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले, लोक दोन्ही बाजूंनी तबला वाजवतात, डबल ढोलकी वाजवतात. मीडिया वालेही वाजवतात आणि इन्फ्लुएन्सर्सही वाजवतात. केलं नाही तर केलं नाही म्हणतात आणि केलं तर हे काय आणि ते काय, तिकडूनही म्हणतात. त्यांचे काम त्यांना करू दिले पाहिजे. त्यात काही प्रॉब्लेम नाही आणि आमची त्यात काही नाराजीही नाही. मात्र, जे हिताचे आहे ते झाले पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या वतीने नागपुरातील अंबाझरी तलाव येथे जलपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत होते.

गडकरी म्हणाले, अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलपर्णीचा प्रश्न आमदार परिणय फुके आणि संजय भेंडे यांनी सातत्याने उपस्थित केला होता. वाडी एमआयडीसी परिसरातून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णी वाढत असल्याचा मुद्दाही चर्चेत आला होता. यावेळी नितीन गडकरी यांनी माध्यमे आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सच्या भूमिकेवर भाष्य करताना कोणावरही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.

‘आपले सरकार असले तरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा’

गडकरी पुढे म्हणाले की, आपले सरकार असले तरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे. जनता ही आपली मालक आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले पाहिजेत, असे गडकरी म्हणाले. अंबाझरीतील जलपर्णीचा प्रश्न आमदार परिणय फुके आणि संजय भेंडे यांनी मांडल्याबद्दल त्यांनी दोन्ही आमदारांचे कौतुक केले. तसेच जलपर्णी पुन्हा वाढता कामा नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच वाडी एमआयडीसीतून येणाऱ्या दूषित पाण्याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे, गडकरी आले, उद्घाटन झाले आणि पुन्हा जलपर्णी वाढली, असे होता कामा नये, असेही गडकरी म्हणाले.

जलपर्णीतून बायो सीएनजी निर्मितीचा पर्याय

जलपर्णीचा प्रश्न केवळ समस्या म्हणून न पाहता त्यापासून रोजगार आणि ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते, असे गडकरी यांनी सांगितले. जलपर्णीपासून पर्स, फ्लॉवर पॉट आणि विविध वस्तू तयार करण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. जलपर्णीपासून बायो-सीएनजी तयार करण्याचीही शक्यता असल्याचे त्यांनी सांगितलं .

भांडेवाडीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचाही गडकरी यांनी उल्लेख केला. कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करून त्याचे सेग्रिगेशन केले जाते आणि त्यातून बायो सीएनजी निर्मिती केली जाते. या प्रकल्पातून दररोज 28 टन बायो सीएनजी निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यातून नागपुरातील सुमारे तीन हजार चारचाकी वाहने चालवता येऊ शकतात, तसेच महानगरपालिकेच्या ताफ्यात पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने न ठेवता पर्यायी इंधन आणि बायोफ्युएलवर वाहने आणण्याची गरज आहे. यामुळे नागपुरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही गडकरी म्हणाले.

गडकरी पुढे म्हणाले की, प्लास्टिक कचऱ्यापासून क्रूड ऑईल तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरता येते. या प्रक्रियेत सुमारे पाच हजार लिटर ऑईल तयार करण्यात आले आहे. भांडेवाडी येथे सेंद्रिय खतनिर्मितीचे कामही सुरू आहे. या खतात प्रयोग करून 25000 टन खत तयार होते. ऑरगॅनिक खतातून एका एकरात 15 टन तुरी आणि 88 टन ऊस झाला. केमिकल फर्टीलायझर चा वापर न करता ऑरगॅनिक खतांचा वापर वाढवावा आणि विषमुक्त शेती व भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed