• Tue. Mar 10th, 2026

    कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत राज ठाकरे यांचं वादग्रस्त विधान, ‘हड… मी ते नाही पिणार’

    कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत राज ठाकरे यांचं वादग्रस्त विधान, ‘हड… मी ते नाही पिणार’

    Raj thackeray Pune : पुण्यात मनसेच्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले व कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून काढण्याचा इशारा दिला. यावेळी जोरदार टीका राजकारण्यांवर करताना दिसले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : पुण्यात मनसेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून टाळकी फिरवण्याचे काम सुरू आहे. गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्रात चिखल केलाय. महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे. महिला दिन हा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे. राज्यात राजकिय फेरीवाले आलेत. राजकिय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत.

    पुढे राज ठाकरे म्हणाले की, संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाचे काम दर १५ दिवसांनंतर तपासले जाणार. कामात जर दिरंगाई केली तर पदावर ठेवणार नाही, असा सज्जन दमच राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलाय. कामचुकार कार्यकर्त्यांना पदावर ठेवणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. यासोबतच त्यांनी म्हटले की, देशातील एकही नदी स्वच्छ नाहीये. परदेशातील नद्या बघा सर्वांनी.
    Satish Bhosale : सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा, सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी, शिरूरकासारमध्ये बंदची हाककुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. गंगा स्वच्छ होणार हे मी राजीव गांधी यांच्यापासून ऐकत आलो आहे. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी माझ्यासाठी आणले होते. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाहीये. यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर यावे असेही म्हटले आहे. ११ मार्चला सर्वांना जबाबदाऱ्या देणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ते म्हणाले की, काही गोष्टी मी आताच स्पष्ट बोलू शकत नाही आणि मी बोलणारही नाही.

    राज ठाकरे यांनी केलेल्या कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या विधानाची जोरदार चर्चा होती असून भाजपाकडून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आलीये. आता गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. काही दिवसांपूर्वीच चर्चा रंगताना दिसली की, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात. मात्र, यावर दोघांनीही काही भाष्य केले नाहीये.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed