• Fri. Mar 6th, 2026
    देशमुखांनी मारण्यासाठी विशेष हत्यारं, आरोपपत्रात रेखाचित्रं; बेदम मारल्यानं पाईपचे १५ तुकडे

    Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांची रेखाचित्रं समोर आली आहेत. विशेष तपास पथकानं या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांची रेखाचित्रं समोर आली आहेत. विशेष तपास पथकानं या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचा उल्लेख आहे. देशमुख यांना मारेकऱ्यांनी अतिशय निर्घृणपणे मारलं. त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांची माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे.

    बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबरला अपहरण झालं. त्यानंतर पुढील काही तास त्यांना मारहाण सुरु होती. संध्याकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. त्यांना अतिशय निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या बरगड्या तुटल्या होत्या. दीड लीटर रक्त साकळलं होतं. नाकातून रक्तस्राव झाला होता. मारेकऱ्यांनी देशमुख यांना कपडे काढून मारलं. देशमुखांना मारहाण करताना ते हसत होते. हत्येचा आसुरी आनंद घेत होते.
    धसांच्या खोक्याच्या घरावर धाड; वन विभागाला सापडलं घबाड; हरिण, मोरांच्या शिकारीचा आरोप
    देशमुखांच्या हत्येसाठी आरोपींना वापरलेल्या शस्त्रांची रेखाचित्रं आता समोर आली आहेत. एसआयटीच्या आरोपपत्रात ५ हत्यारांचा उल्लेख आहे. पाईप, वायर लावलेली मूठ, गज, लाकडी दांडा या हत्यारांचा वापर देशमुखांना बेदम मारहाण करताना केला गेला. देशमुखांना मारण्यासाठी मारेकऱ्यांनी विशेष हत्यारं तयार केली होती, असा उल्लेख आरोपपत्रात आहे.

    संतोष देशमुखांना मारेकऱ्यांनी अमानुषपणे मारलं. पांढरा पाईप, तपकिरी रंगाच्या गॅस पाईपनं त्यांना मारण्यात आलं. लाकडी दांडा, तारा लावलेली एक वायरदेखील मारण्यासाठी वापरण्यात आली. देशमुखांना मारताना आपल्याला इजा होऊ नये यासाठी त्या वायरला एक मूठ बसवण्यात आली होती. ही सगळी शस्त्रं जप्त करण्यात आलेली आहेत.
    Suresh Dhas: घोटाळे ते खून, सगळं बीडमध्ये कसं? ‘कुटे’ काय घडलं? सुरेश धसांकडून सचिन पिळगावकरांचाही उल्लेख
    देशमुखांना मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या एका पाईपचे १५ तुकडे झाले. ते १५ तुकडे एसआयटीनं फॉरेन्सिकला पाठवले होते. हे तुकडे त्याच पाईपचे आहेत का, ज्या पाईपनं देशमुखांना मारहाण झाली होती, असा प्रश्न एसआयटीनं फॉरेन्सिकला विचारला होता. त्या पाईपनं मारहाण झाल्यानं देशमुखांचा मृत्यू होऊ शकतो का, असा सवाल एसआयटीकडून आरोग्य विभागाला विचारण्यात आला होता. त्याला आरोग्य विभागानं होकारार्थी उत्तर दिलं.

    देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं १५०० हून अधिक पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात ५ गोपनीय साक्षीदारांचे जबाब आहेत. त्यातून वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांचा हत्येतील सहभाग स्पष्ट झाला आहे. कराडनं आवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यासाठी त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं होतं. याच खंडणी प्रकरणातून देशमुखांची हत्या झाली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed