Holi Special Train Konkan Railway : शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे जादा गाड्या सोडणार आहे. जाणून घ्या कधी आणि कुठून सुटणार विशेष ट्रेन.
कधी, कुठून, कोणती रेल्वे असणार?
कोकण रेल्वे मार्गावरील सोडण्यात येणाऱ्या या विशेष ज्यादा गाड्यांसाठी कोणतंही आरक्षण नसेल. थेट रेल्वे गाडीतून तिकीट काढून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. मुंबईतील दादरवरुन कोकणात जाण्यासाठी पुढील प्रमाणे गाड्यांचे नियोजन आहे. दादरवरून रत्नागिरीला जाण्यासाठी होळीसाठी विशेष रेल्वे गाड्या पुढील प्रमाणे आहेत.
०११३१ – दादर – रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ आणि १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटेल. रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.
०११३२ – रत्नागिरी – दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटेल आणि दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.
Ratnagiri News : माझ्या वक्तव्याचा राजकारण करत विपर्यास केला, पुणे स्वारगेट प्रकरणावरुन योगेश कदम यांची स्पष्टोक्ती
दादर – रत्नागिरी विशेष रेल्वे कोणत्या स्थानकांत थांबणार?
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड हे थांबे या विशेष गाड्यांसाठी असणार आहेत.
Holi Special Train : शिमगोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेची विशेष गाडी, कधी आणि कुठून सुटणार जादा ट्रेन
दरम्यान, या कोकणात जाण्यासाठी असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांसाठी कोणतही आरक्षण नसल्याने जी कुटुंब रेल्वेतून प्रवास करतात त्यांचे हाल होतात. त्यामुळे काही प्रमाणात आरक्षण असणं, हे आवश्यक होतं असं मत कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणारे प्रवासी कोकण रेल्वेचे अभ्यासक अक्षय अक्षय म्हापदी यांनी व्यक्त केलं आहे.

