• Thu. Sep 17th, 2026

पाश्चात्य देशांसारखे कायदे करा, चोरी केली की हात कापतात, अजितदादांच्या नेत्याची प्रतिक्रिया

पाश्चात्य देशांसारखे कायदे करा, चोरी केली की हात कापतात, अजितदादांच्या नेत्याची प्रतिक्रिया

Pune Swargate Bus Depot Assault Case : आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिले असतील, पाश्चात्य देशात चोरी केली तर हात कापले जातात. दोन वेळा चोरी केली तर दोन्ही हात कापले जातात, त्यामुळेच पाश्चात्य देशात दुकानं उघडी ठेवून कुठेही जातात. अशी सूचक प्रतिक्रिया इद्रीस नाईकवाडी यांनी दिली.

Lipi

इरफान शेख, सोलापूर : पुण्यातील स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक झाल्यानंतर राज्य अल्पसंख्याक अयोगाचे अध्यक्ष इद्रीस नाईकवाडी यांनी मोठे भाष्य केले आहे. मी तर अशी शिफारस करेन, पाश्चात्य देशात जसे कडक कायदे आहेत, तसे कायदे महाराष्ट्र आणि भारत देशात लागू व्हायला पाहिजेत. कारण आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिले असतील, पाश्चात्य देशात चोरी केली तर हात कापले जातात. दोन वेळा चोरी केली तर दोन्ही हात कापले जातात, त्यामुळेच पाश्चात्य देशात दुकानं उघडी ठेवून कुठेही जातात. अशी सूचक प्रतिक्रिया इद्रीस नाईकवाडी यांनी दिली.

शरिया कायद्याचं मी समर्थन करत नाहीय, पण तसे कायदे लागू झाले तर बलात्काराच्या घटना होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इद्रीस नाईकवाडी यांनी सोलापुरात दिली आहे. गुरुवारी रात्री राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नाईकवाडी महत्वाचे भाष्य केले आहे.
Dattatraya Gade : मीसुद्धा ‘गाडे’च, पण दत्ता नाही! तुम्हाला तो हवाय का? पोलिसांचा ‘राम और श्याम’ गोंधळ, अखेर…

लगेचच पुण्याच बिहार करायला जाऊ नका

इद्रीस नाईकवाडी हे मूळचे पुण्याचे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे विधान परिषदेवर आमदार आहेत. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे पाहून पुण्याचे लगेच बिहार करायला जाऊ नका. महाराष्ट्र पोलीस दल अतिशय सक्षम आहे.

Pune Assault Case : पाश्चात्य देशांसारखे कायदे करा, व्हिडिओ बघा, चोरी केली की हात कापतात, आता… अजितदादांच्या नेत्याची प्रतिक्रिया

पाश्चात्य देशासारखा कायदा भारतात असायला हवा

पाश्चात्य देशातील शिक्षा होतानाचे व्हिडीओ आपण पाहता, त्यामुळे असे कायदे भारतात होणे गरजेचे आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे प्रमुख इद्रीस नाईकवाडी यांनी शरिया कायद्याच जरी थेट उल्लेख घेऊन समर्थन केले नाही तरी पाश्चात्य देशातील कायद्याचं समर्थन केले आहे.
Pune Assault Accuse Arrest : तहान-भुकेने व्याकूळ, नराधम दत्ता गाडे पाण्यासाठी नातेवाईकांकडे गेला, मगरीचे अश्रू ढाळत म्हणाला, मला पश्चाताप होतोय…

काय आहे प्रकरण?

स्वारगेट एसटी बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरुरमधील गुनाट गावात ऊसाच्या शेतात पुणे पोलिसांकडून गाडेची धरपकड करण्यात आली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभवआणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed