• Tue. Mar 10th, 2026
    बाइकपुढे जनावर आल्याने जीव गमावला, लेकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचं स्तुत्य काम; ३ जणांना मिळालं जीवदान

    Nagpur News : नांदेडच्या एका तरुणामुळे तीन जणांना जीवदान मिळालं आहे. लेकाच्या मृत्यूनंतरही त्याच्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : नांदेड जिल्ह्यात बाइकपुढे जनावर आल्याने मेंदुमृत झालेल्या तरुणाचे सोमवारी नागपुरात अवयवदान करण्यात आले. ओंकार अशोक आकुलवार (वय २१) असे या तरुणाचे नाव असून, तो किनवट तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी होता.

    २२ फेब्रुवारी रोजी ओंकारचा अपघात

    त्याचे वडील अशोक ऑटोचालक आहेत, घरी आई सुमालता आणि बहीण दीपिका (१९) असा परिवार आहे. २२ फेब्रुवारी रोजी ओंकार रात्री ९ च्या सुमारास बाइकने घरी जात असताना त्याची धडक रस्त्यावर आलेल्या जनावराला लागली. यात तो खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
    Nagpur News : एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर, पण आई-वडिलांचा मोठा निर्णय, तिघांना नवजीवन

    अपघातानंतर उपचारांना प्रतिसाद नाही, डॉक्टरांकडून मेंदुमृत घोषित

    प्रकृती जास्तच खालावल्याने त्याला नागपूरला मेडिकलमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले. येथे एक दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सर्व चाचण्या करून डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सुनील गजभारे, डॉ. सोमा चाम, डॉ. दीपाली विडोळे, डॉ. प्रसेनजित ढवळे, डॉ. प्रणाली गुरुकर या तज्ज्ञांच्या पथकाने त्याला मेंदुमृत घोषित केले.

    मेडिकलमधील डॉ. सुनील गजभारे, समन्वयक डॉ. सुमित चाहाकार, श्याम पंजाला यांनी त्याच्या नातेवाईकांचे अवयवदानाविषयी समुपदेशन केले. वडिलांनी संमती दिल्यानंतर झेडटीसीसीला कळवण्यात आले. त्यानंतर तेथील समन्वयक दिनेश मंडपे यांनी तरुणाच्या कुटुंबीयांच्या अवयवदानासाठी होकारानंतर अवयव वाटप निश्चित केले.
    Organ Donation : बाराव्या वर्षी वैदेही गेली, पण चौघांना नवं आयुष्य देऊन, मुंबईकर बालिकेच्या पालकांचा स्तुत्य निर्णय

    बाइकपुढे जनावर आल्याने जीव गमावला, लेकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचं स्तुत्य काम; ३ जणांना मिळालं जीवदान

    तरुणामुळे तीन जणांना जीवदान, तसंच नेत्रपेढीला नेत्रदान

    मृत तरुणाचं यकृत व्होक्हार्टमध्ये ६१ वर्षाच्या महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आले. एक किडनी मेडिकलमधील ३८ वर्षांच्या महिलेवर, तर दुसरी वोक्हार्टमधील ५३ वर्षांच्या पुरुषावर प्रत्यारोपित करण्यात आली. नेत्रदान मेडिकलच्या नेत्रपेढीला करण्यात आले. झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. मेडिकलतर्फे ओंकारला श्रद्धांजली वाहण्यात आली. झेडटीसीसीने त्याचे पार्थिव नांदेड जिल्ह्यातील त्याच्या मांडवा गावी पाठवण्याची व्यवस्था करून दिली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed