“गाफील राहू नका. त्यांचं आहे ना पिल्लू, पेंग्विन हे रात्री बारा वाजता कुठे जातं आणि सकाळी सहा वाजता येतं, हे रात्री काय-काय धंदे करतं ते सगळ्यांना हळूहळू कळेल”, अशी टीका रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
“गाफील राहू नका. त्यांचं आहे ना पिल्लू, पेंग्विन हे रात्री बारा वाजता कुठे जातं आणि सकाळी सहा वाजता येत, हे रात्री काय-काय धंदे करतं ते सगळ्यांना हळूहळू कळेल ना. आता ते लग्न का करत नाही ते मला माहिती नाही. त्या खोलामध्ये मी जात नाही. अहो काय चाललंय. कुछ तो गडबड नहीं. अरे दाल में काला नहीं. पुरी दालही काली हैं”, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली.
“शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही 55 वर्षे काम केलं. हे कालचं पेंग्विन त्याने आम्हाला आदेश द्यायच? त्याला आम्ही साहेब म्हणायचं? अहो अक्षरश: अंगाला घाम फुटायचा. किती अपमान सहन करायचा?”, असं रामदास कदम म्हणाले.
‘ठाकरेंना हिंदू शब्द म्हणायला लाज वाटायला लागली’
“संबंध महाराष्ट्रात स्वाभिमानी नेता म्हणून ज्याने जगण्याचं ज्याने काम केलं तो नेता म्हणजे एकनाथ शिंदे. म्हणून त्यांचा दिल्लीत सत्कार होतोय. हे माकडं धावताय दिल्लीला, याला भेट, त्याला भेट. सोनिया गांधींचे पाय पडणं. किती मोठा स्वाभिमान. बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं? हिंदुत्व सोडलं नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीला उद्धव ठाकरेंना हिंदू हा शब्द म्हणायला लाज वाटायला लागली”, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली.
रामदास कदमांचा ठाकरेंवर घणाघात
“मला आनंद आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे हे पुढे नेवून जात आहेत. याचा मला आनंद आहे. त्यांचा मला अभिमान आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली, त्यांच्या विचारांना काळीमा फासली, तसेच बाळासाहेबांच्या पाठीत राजकीयदृष्ट्या खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्हाला राजकारणात संपूर्ण संपवल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही. महाराष्ट्र तुम्हाला राजकारणातून संपवल्याशिवाय राहणार नाही”, असा देखील घणाघात रामदास कदम यांनी केला.
‘बावनकुळे यांच्या घरी नक्की काय डील झाली?’; धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर संजय राऊतांचा सवाल
‘दापोलीत उद्धव ठाकरेंचे 5 नगरसेवक शिवसेनेत’
“रत्नागिरीत अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. शिवसेनेचे कोकणात 9 आमदार आले. एक आमदार जेमतेम काठावर आला. त्यामुळे कोकणवासीयांनी दाखवून दिलं की, एकनाथजी खरी शिवसेना तुमची आहे. भगवा झेंडा तुमच्या हातात शोभतो. दापोलीत उद्धव ठाकरेंचे पाच नगरसेवकांनी योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला”, अशी माहिती रामदास कदम यांनी आपल्या भाषणात दिली.

