सिंधुदुर्ग : सर्वसामान्यांना देवगड हापूस चाखता येणार नाही. बार कोड पाहूच ग्राहकांनी आंबा घ्या,अन्यथा फसवणूक होणार नाही.
तळकोकणातील बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे.कोकणात यावेळी पाऊस उशिरा राहिल्यामुळे आंबा बागायतदार संकटात पडले आहेत. ज्यावेळी नोव्हेंबर महिन्यामध्ये कलमांना मोहोर येण्याची गरज होती त्यावेळी कलम पालवी आली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा तळकोकणात आंबा तीस टक्के बागायतदारांना मिळणार आहे.त्यामुळे खर्चाचा ताळमेळही बसत नाही. यावेळी सर्वसामान्य खवय्यांना आंबा खाताना आंबटच लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना यंदाचा आंबा खाता येणार नाही. पर राज्यातील देवगड हापूसच्या नावाखाली आवक वाढली आहे. त्यामुळे सध्या देवगड हापूस या नावाने मार्केटमध्ये विकला जातोय.देवगड हापूसच्या नावाचा बॉक्स वापरला जातो. त्यामुळे आंबा खाणाऱ्यांची फसवणूक होत आहे. यासाठी आंबा बागायतदारांनी एक मोठा निर्णय घेतला असून, यावेळी प्रत्येक आंब्यावर बार कोड लावलेला दिसणार आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही असं आंबा बागायतदार सांगत आहे.
