महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 13 Feb 2025, 1:00 pm
Satara Crime News : पूर्व वैमनस्याचा राग मनात धरुन एका १९ वर्षीय मुलाने २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण केल्याच्या घटनेने सातारा हादरले आहे. एखाद्याची हत्या करण्यापर्यंत नेमकं प्रकरण काय झालं असेल, याचा आता पोलिस यंत्रणा तपास करत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस महेंद्र निगडे (वय १९) याने अमर उर्फ चंदूची तलवारीने सपासप वार करुन हत्या केल्यानंतर स्वतः ती रक्ताने माखलेली तलवार घेऊन पोलिस स्टेशन गाठले. त्याचा असा अवतार पाहून पोलिसहि काही वेळाकरिता अवाक् झाले.
पूर्व वैमनस्याचा राग मनात धरुन एका १९ वर्षीय मुलाने २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण केल्याच्या घटनेने सातारा हादरले आहे. एखाद्याची हत्या करण्यापर्यंत नेमकं प्रकरण काय झालं असेल, याचा आता पोलिस यंत्रणा तपास करत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी तेजस महेंद्र निगडे (वय १९) याने अमर उर्फ चंदूची तलवारीने सपासप वार करुन हत्या केल्यानंतर स्वतः ती रक्ताने माखलेली तलवार घेऊन पोलिस स्टेशन गाठले. त्याचा असा अवतार पाहून पोलिसहि काही वेळाकरिता अवाक् झाले.
शिरवळ (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत जुन्या औद्योगिक वसाहतीमधील काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीलगत असणाऱ्या चौकात युवकाचा तलवारीने सपासप वार करीत खून करण्यात आला. पूर्वीच्या भांडणातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे. खंडाळा तालुक्यातील वडवाडी येथील अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भोर तालुक्यातील गुणंद येथील तेजस महेंद्र निगडे (वय १९) असे खून करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिरवळ पोलीस निरीक्षक संदीप जगताप घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
