• Tue. Jun 16th, 2026

    ‘महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने नेण्यात एकनाथ शिंदेंचे मोठे योगदान’, शरद पवारांकडून कौतुक

    ‘महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने नेण्यात एकनाथ शिंदेंचे मोठे योगदान’, शरद पवारांकडून कौतुक

    Authored byचेतन पाटील | Reported by प्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Feb 2025, 10:31 pm

    98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी दिल्ली : “अलिकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण? याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येते. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून योग्य दिशा देण्याचे काम शिंदे यांनी केले, त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व पक्षांच्या नेत्यांशी सुसंवाद ठेवून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल”, असे कौतुकोद्वार नवी दिल्ली होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आज काढले. पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात पवार बोलत होते.

    “सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झंझीभाई होते. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदवळ गावचे शरद पवार देखील याच यादीत येतात”, असं शरद पवार म्हणाले. “ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भाग आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सावळाराम पाटील, रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

    साताऱ्याचेच कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. पाटील यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करण्याचा किस्सा पवार यांनी यावेळी सांगितला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षाचे यावेळी कौतुक केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांच्याबाबत बोलताना शाब्दिक फटकेबाजी केली.
    ‘शरद पवारांची गुगली अनेकांना कळत नाही, पण मला अजून गुगली टाकली नाही’, पवारांसमोर शिंदे काय म्हणाले?

    एकनाथ शिंदे काय म्हणाले?

    “महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार आहे. या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव आहे. पवार साहेब सारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. महादजी शिंदे यांचे घराण सातारा जिल्ह्यातील कणेरखेड याच जिल्हात माझा ही जन्म झाला. तसेच माजी क्रिकेटपटू सदु शिंदे यांचे शरद पवार जावई आहेत. पवार साहेबांची राजकारणातील गुगलीही कळत नाही. मात्र आपले पवार साहेबांचे चांगले संबध आहेत, त्यामुळे ते मला गुगली टाकणार नाहीत”, अशी शाब्दिक फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed