• Mon. Mar 16th, 2026
    आगीचे लोट आणि कानठळ्या, ओशिवारा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, १५० दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

    Mumbai Fire In Oshiwara Furniture Market: अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा येथील लाकडी फर्निचरच्या मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. येथे झालेल्या सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास या फर्निचर मार्केट आणि लाकडी गोदामाला भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील रिलीफ रोडवर असलेल्या घास कंपाऊंडमध्ये सकाळी साडे ११ च्या सुमारास ही आग लागली.

    ओशिवारा फर्निचर मार्केटमध्ये आग, आकाशात धुराचे लोट

    अंधेरी पश्चिमेतील असलेल्या ओशिवारा येथे एक मोठं फर्निचर मार्केट आहे. येथे फर्निचरची मोठ मोठी दुकानं आणि लाकडी गोडाऊन देखील आहे. या फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागली आहे. लाडकाचं गोडाऊन आणि फर्निचरचं सामान असल्याने ही आग मोठ्या प्रमाणात आणि वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, आगीने सध्या रौद्र रुप घेतलं असून आगीचा मोठा भडका दिसून येत आहे. तर आकाशात दूरवर धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

    अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल, १५० हून अधिक दुकानांमध्ये आग पसरल्याची माहिती

    जवळपास १२ अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा जंबो टँकर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग १५० हून अधिक लाकडी फर्निचरच्या दुकानांमध्ये पसरली आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग फर्निचर मार्केटमध्येच लागली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

    सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. लाकडी गोडाऊन आणि फर्निचर मार्केट असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे आणि ती वाढत चालली असल्याची माहिती आहे. दुकानं जळून खाक होत आहे. आतापर्यंत सात ते आठ सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    मुंबई उपनगरच्या ‘आर मध्य’ आणि ‘एच पश्चिम’ वॉर्डातील सर्व वृक्षांची आरोग्यविषयक सखोल तपासणी – मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
    बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    महाराष्ट्र हे उद्योग व गुंतवणुकीची उत्कृष्ट परिसंस्था असलेले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed