Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य मंत्रालयाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांच्या नाराजीच्या चर्चांवर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, एकनाथ शिंदे हे नाराज आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जातंय. आता नाराजीच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केले आहे.
पुढे शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी सांगितले 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे मी पाळत आलो आहे. रेस्ट रूममध्ये गेलो सर्व भकास होत. एअर कंडीशन विश्रांतीगृहाचे उद्घाटन केले. जिथे एसटी डेपो तिथे कॅशलेस दवाखाना. मगाशी म्हणालो एकजूट होऊया आणि कॅन्सरला हरवूयात. 70 कोटींचे नॅचरोपॅथी वेलनेस सेंटर सुरू करणार आहेत त्याबद्दल आभार. मी सफरचंदाची पण लागवड केली आहे.
सुरेश धसांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले, ते खरोखरच…मी गावी गेलो की, मीडियामध्ये बातमी येते एकनाथ शिंदे नाराज म्हणून. मी दहा तास प्रवास करून जाण्यापेक्षा हेलिकॉप्टरने जातो, तेवढ्या वेळात 10 हजार सह्या करतो म्हणून 2 पेन ठेवले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 450 कोटींची वाटप केले. अडीच वर्षात रेकॉर्ड ब्रेक योजना राबविल्या. कार्यक्रमासाठी आजचा दिवस निवडला यापेक्षा दुसर काय हवं. महात्मा फुले आरोग्य योजना 1.5 लाखाची होती आता 5 लाखाची. कोणी जात नाही तिथे मी जातो, असेही शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मंत्री आहे बोलायला नको पण फाईल तयार करत बसलो तर माझे मंत्रीपद जाईल म्हणून गाड्या भरून घेऊन गेलो वाटायला. आम्ही वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांना मोफत उपचार दिले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. ह्या हाताने केलेले ह्या हाताला कळत कामा नये अशी पद्धत माझी, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. नाराजीच्या चर्चांवर देखील एकनाथ शिंदे हे थेट भाष्य करताना दिसले आहेत.

