मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा गंभीर आहे. पण त्यावरुन त्यांचे फोटो दाखवत चुकीचे दावे केले जातात, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
“साधारणपणे एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा गंभीर असतो. तुम्ही 90 टक्के बघितलं तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा गंभीर असतो. ते मुख्यमंत्री असतानाही त्यांचा तसाच चेहरा गंभीर होता. आता त्यांचे तेच फोटो दाखवून शिंदे हसतच नाहीत. नाराज आहेत, असं चाललं आहे. आता त्यांनी काय करावं? हा प्रश्नच आहे. प्रत्येकाची आपली कार्यपद्धती असते. प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते तशी त्यांची धीरगंभीर पर्सनॅलिटी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार?
“उद्धव ठाकरे आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे. त्या व्यतिरिक्त कुठेही भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की, समोर भेटलानंतर नमस्कार नाही करणार. आम्ही समोरासमोर भेटतो. नमस्कार करतो. दोन चांगल्या गोष्टी बोलतो. संबंध आहेतच. दक्षिण भारतासारखी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. संवाद करायला. बोलायला काही अडचण नाही. लगेच त्यावरने काहीही चर्चा होते”, अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
‘देशाची लोकशाही आयसीयूत, पूर्णपणे फ्रॅक्चर, शेवटचा घटका मोजतेय’, संजय राऊत यांचं संसदेत वादळी भाषण
“त्यादिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धव ठाकरे यांना लग्नात भेटले. उद्धव ठाकरेंना भेटल्यावर त्यांची सवय आहे, ते काहीतरी मिश्किलपणे बोलतात. त्यानंतर हे कायतरी बोलले. लगेच त्यावर अशा बातम्या झाल्या की, जसं दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार आणि चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पायघड्या टाकलेल्या आहेत. असं नाही. ठीक आहे. संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही. पण आम्ही लगेच त्यांना जवळ घेतोय आणि सत्तेत घेतोय अशी परिस्थिती नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

