Edited byविमल पाटील | Authored by दीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Feb 2025, 9:54 pm
NCP Sharad Pawar party Secreatary Died : बीड जिल्ह्यातील नाकलगाव येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्राध्यापक श्रीहरी काळे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घडले असे की. प्राध्यापक श्रीहरी काळे व डॉक्टर भगवान सरवदे एका लग्न समारंभासाठी जाऊन माघारी परतत असताना खरात आडगाव या राष्ट्रीय महामार्गावर आपली मोटरसायकल लावून उभे होते. त्यांना सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राध्यापक श्रीहरी काळे हे उत्तम वक्ते होते. माजलगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची मोठी धुरा सांभाळली होती. त्यांच्या या दुःखद निधनाने त्यांचे मूळ गाव असलेल्या नाकलगाव या ठिकाणी शोककळा पसरली आहे.

