Produced byविश्रांती शिंदे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम31 Jan 2025, 9:43 pm
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग बनविण्याचे जाहीर केले आहे.मागील दोन दिवसापासून ज्या जमिनीवरून शक्तीपीठ महामार्ग जात आहे…तेथील ग्रामपंचायतीमध्ये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकरी प्रचंड चिडले असून परभणीतल्या शेतकऱ्यांनी आज थेट जिल्हाधिकारी गाठले. भव्य असा मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देणार नाही…असा थेट इशारा दिला, त्याचबरोबर त्यांनी निवेदनही दिले.यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.