• Thu. Jul 30th, 2026
    ६ वर्षीय मुलगी चौथ्या मजल्यावरुन पडली अन् आई-बापाच्या काळजाचा ठोका चुकला, चटका लावणारा अंत

    Kalyan News : कल्याण-शीळ महामार्गावर असलेल्या डोंबिवलीजवळच्या दावडी गावात दुर्दैवी घटना घडली आहे. येथील दर्शना फॉर्म नामक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कोसळून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

    Lipi

    कल्याण : कल्याण-शीळ महामार्गावर असलेल्या डोंबिवलीजवळच्या दावडी गावात दुर्दैवी घटना घडली आहे. येथील दर्शना फॉर्म नामक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कोसळून सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. परी छोटुलाल बिंद असे मृत मुलीचे नाव आहे.

    पोटची मुलगी गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील जिन्याच्या दर्शनी भागाला संरक्षक ग्रील लावले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विकासकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मुलीच्या वडिलांनी केली आहे. तर याबद्दल मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
    आधी विद्यार्थीनीला अत्याचाराची धमकी, नंतर १०० रुपयांची सुपारी दिली अन् अल्पवयीन मुलाकडून संपवण्याचा प्रयत्न; पुणे हादरलं
    छोटुलाल आपल्या पत्नी व दोन मुलीबरोबर नालासोपारा येथे राहतात. छोटूलाल हे सोमवारी सकाळी आपल्या सहा वर्षाच्या परीला घेऊन डोंबिवली जवळच्या दावडी गावात राहणाऱ्या भावजीकडे पूजेकरिता आले होते. घरी पूजा सुरु असताना परी सर्वांच्या नकळत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत गेली आणि तिथेच खेळत होती. या गॅलरीला ग्रील नव्हते. खेळता खेळता परीचा तोल गेला आणि ती इमारतीवरून खाली कोसळली. जमिनीवर आदळल्याने परीचा जागीच मृत्यू झाला. परीच्या वडिलांनी तिला रूग्णालयात येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून परीला मृत घोषित केले.

    दर्शना फॉर्म इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्टेअरकेसला अर्थात जिन्याच्या दर्शनी बाजूला संरक्षक ग्रील नसल्याने त्याच मोकळ्या जागेतून कोसळून पाहुणी म्हणून आलेल्या परीचा बळी गेला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    एकीकडे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. तर दुसरीकडे दुर्दैवी परीचे वडील छोटूलाल बिंद यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन इमारतीच्या बेजबाबदार विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने अधिक तपास करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed