• Sun. Jun 14th, 2026
    रात्रीच अंतरवाली गाठलं, मनोज जरांगेंसह लढा देणार, धनंजय देशमुख-मस्साजोग ग्रामस्थ उपोषणात सहभागी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 9:13 am

    मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सोमवारी रात्री मनोज जरांगे यांच्या उपोषणात सहभागी झाले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरावालीत सातव्यांदा उपोषण करत आहेत. सोमवारी जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. यावेळी जरांगेंची प्रकृती काहीशी अस्थिर झाली होती, तर जरांगेंसह बसलेल्या इतर उपोषणकर्त्यांची देखील तब्येत खालवली होती. मात्र जरांगेंना बळ देण्यासाठी धनंजय देशमुख आणि मस्साजोगमधील काही ग्रामस्थ सोमवारी अंतरवालीत दाखल झाले, धनंजय देशमुखही जरांगेंच्या उपोषणात सहभागी झाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed