Pratap Sarnaik Statement : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मात्र काहीसी मरगळ आल्याचे चित्र आहे. यातच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह काही बड्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंची साथ सोडली आहे. यातच आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यात ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्याचे संकेत दिले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस हजेरी लावून कामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय विषयांवर देखील भाष्य केले. ‘पुढे पुढे बघा काय होतंय, धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगे वाटायला नको, असे सूचक विधान प्रताप सरनाईकांनी केले आहे. तर ‘ऑपरेशन टायगर’ राबवून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अनाथांचा नाथ एकनाथ! ‘सुखरूप आहेस काळजी करू नकोस’; अपघात झालेल्यात तरूणाच्या मदतीला धावले शिंदे
धाराशिवमध्ये ठाकरेंचे कोणते नेते शिवसेनेच्या गळाला?
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा एक खासदार आणि दोन आमदार कार्यरत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे ठाकरे गटाचे प्रतिनिधी आहेत. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. आता महायुतीच्या दिशेने वारे वाहू लागल्याने त्यामध्येच ठाकरेंचे शिलेदार शिंदे गटाची वाट धरणार? की पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
शिवसेनेतील इन्कमिंगमुळे ठाकरे गटाला मोठी गळती लागणार? मंत्री सरनाईकांकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याचे संकेत
दरम्यान, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पहिल्या जिल्हानियोजन समितीच्या बैठकीतील खेळीमेळीच्या वातावरणाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईकांनी तुळजापुरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार असल्याचा आरोग्य विभागाचा पहिला निर्णय घेतला आहे. तर यावेळी प्रताप सरनाईकांनी तानाजी सांवंतांच्या नाराजीवरही भाष्य केले. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही. ती बदलत असते अदलाबदल होत असते, असे वक्तव्य सरनाईकांनी केले. पहिल्याच जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर असल्याने त्यांच्या नाराजीबाबत आपल्याशी बोलणं झालं नसल्याचंही सरनाईकांनी सांगितलं.