Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून येत असताना हा अपघात झाला. या अपघातमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वाढदिवसाची पार्टी करून परतत असताना, तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. पुण्यातल्या वडगाव ब्रिजच्या टर्निंग ला स्विफ्ट कारने एका थांबलेल्या बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीत असलेल्या सहा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच जण एक गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी जाऊन नजदिकच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी दाखल केला आहे तर पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशन करत आहे.
आज दिनांक 25/01/2025 रोजी सकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास वडगाव ब्रिज मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आयशर बस क्रमांक MH 14 GD 7605 हिस स्विफ्ट कार नंबर MH 12 KW 3663 या कारने मागील बाजूने धडक देवून अपघात झाला आहे. सदर अपघातामध्ये , यातील जखमी 2,3,4 हे सिल्वर बर्च हॉस्पिटल नरे पुणे येथे व जखमी 5,6 हे जुपिटर हॉस्पिटल बाणेर येथे पुढील उपचार घेत आहेत. बस चालक यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर करवाई करीत आहोत…
सोहम आलिष खळे वय 19 वर्षे, राहणार (रो हाऊस नंबर 10 कॅसल वर्ल्ड औंध पुणे)
आयुष अंबिदास काटे वय 20 वर्ष राहणार (फ्लॅट नंबर 305 सिद्धी टॉवर दापोडी पुणे)
अथर्व हंबीरराव झेडगे वय 19 वर्ष राहणार पिंपळे गुरव पुणे
प्रतीक दीपक बंडगर व 19 वर्ष राहणार (गांगर्डे नगर पिंपळे गुरव पुणे)
हर्ष नितीन वरे वय 19 वर्ष राहणार (पिंपळे गुरव पुणे)
