• Tue. Mar 10th, 2026

    अजित दादांचा आमदार खरंच ‘एक नंबरsss..’; मटका अड्ड्यावर पोलिसांना घेऊन छापा, दादा स्टाईल कारवाई

    अजित दादांचा आमदार खरंच ‘एक नंबरsss..’; मटका अड्ड्यावर पोलिसांना घेऊन छापा, दादा स्टाईल कारवाई

    मावळचे आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा केला. वडगाव शहरात दौऱ्यात एका मटका अड्ड्यावर छापा टाकून दोषीला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दारूच्या अड्डयावरही छापा टाकला आणि पोलीस प्रशासनाला कडक सूचना दिल्या.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : मावळचे आमदार सुनील शेळके हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावांच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यातच वडगाव शहरात जनसंवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांनी एका मटका अड्डयावर अचानक छापा टाकला. या मटका चालवणाऱ्याला जाबही विचारला आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

    मावळ तालुक्यासह शहरातील वाढती गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना यावेळी आमदार सुनील शेळके यांनीच दिल्या. तसेच नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार शेळके यांनी विनंती केली. आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रेशनिंग धान्य, शासकीय योजना, विविध दाखले, रेशनकार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेळके यांनी चांगलेच धारेवर धरले.

    केशवनगर भागात दौरा सुरू असताना नागरिकांनी रेल्वे लाईनच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्याने खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आमदार शेळके यांच्याकडे मांडल्या. त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जावून मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर प्रभाग ४ मध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्डयावरही त्यांनी छापा टाकला. सुनील शेळके यांचा दौरा सुरु असताना हा प्रकार घडल्याने आमदारांनी जागेवर या गोष्टीची दाखल घेत. असे प्रकार करणार्यांना चांगली अद्दल घडवा, कसे देखील पोलीस प्रशासनाला शेळके यांनी सांगितले.

    सुनील शेळके यांनी १ लाख ८ हजार ५६५ इतक्या विक्रमी मताधिक्यासह विजय मिळवला होता. तर शेळकेंनी विरोधी उमेदवार बापू भेगडे यांचा पराभवाचा धक्का केला होता. सुनील शेळके यांना २०१९ च्या निवडणुकीमध्ये १,६७,७१२ इतकी मतं मिळाली होती. तर, भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांना ७३,७७० इतकी मतं मिळाली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed