रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंमधील चर्चेनंतर स्थगिती देण्यात आली. यावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली असून विरोधकांना सुनावले आहे. आम्ही दिलदार आहोत म्हणून मागच्यावेळी मंत्रिपद सोडलं, असं गोगावले म्हणाले.