• Sat. Jan 11th, 2025
    रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशींना”चले जाव” चा इशारा!यूपीच्या मुख्यमंत्र्यांचे मुंबईत पोस्टर

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Jan 2025, 12:37 pm

    Mumbai News : मुंबईत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसह रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशींना इशारा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर भाजप नेते विश्वबंधू राय यांनी अंधेरी आणि जोगेश्वरी भागात लावले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असलेले बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात इशारा देणारे पोस्टर्स मुंबईतील अंधेरी आणि जोगेश्वरी भागात झळकल्याचे दिसून आले. या पोस्टरमध्ये मोठ्या अक्षरात लिहिले आहे की, घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्यांनो जर इथे असाल तर आमची वसाहत, आमचे शहर, आमचा जिल्हा, आमचे राज्य, आमचा देश, आमची शाळा-कॉलेज, आमची दुकाने, व्यवसाय, व्यापार, नोकरी, घरे आणि जमीन सोडून चालते व्हा.

    हे पोस्टर विश्वबंधू राय नावाच्या भाजप कार्यकर्त्याने लावले असल्याचे समजते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान विश्वबंधू राय यांनी योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ या घोषणेबाबत अनेक पोस्टर्स लावली होती. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वात पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर सातत्याने कारवाई करत आहेत. अशावेळी, योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र असलेले पोस्टर मुंबईत दिसून आले.

    टोल फ्री क्रमांक जारी करण्याची मागणी

    मुंबई भाजप सचिवांनी, मुंबई पोलीस आयुक्तांना लिहीलेल्या पत्रात, मुंबई पोलिसांनी बांगलादेशी लोकांविरोधात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्याची मागणी केली आहे. ज्यावर सामान्य नागरिक बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांची माहिती देऊ शकतात. जेणेकरून पोलिसांना वेळीच कारवाई करता येईल. हे परदेशी नागरिक भारतीयांच्या अन्न, वीज, पाणी आणि सर्व सुविधांचा गैरवापर करून समाजात गुन्हेगारी वाढवत आहेत.

    येथील दोन शहरात वेगवेगळ्या एसआयटींमार्फत तपास सुरू आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक सरकारी अधिकारी, नेते, राजकारणी आणि बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या सिंडिकेटचा समावेश आहे. ते म्हणाले की, व्होट बँक वाढवण्यासाठी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांचे जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे बनवली जातात. जन्म दाखला बनवताच आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सहज बनते.

    यानंतर मतदान कार्ड आणि बँक खाती उघडण्यात येतात. इतकेच नाही तर यातील अनेक बांगलादेशी नागरिकांचे भारतीय पासपोर्टही बनवल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले आहे. मोठी बाब म्हणजे नाशिकच्या मालेगावमध्ये ज्यांचे बनावट रहिवासी पुरावे बनवण्यात आले, त्यांचे पासपोर्ट गुजरातमधील सुरत पासपोर्ट कार्यालयातून बनवण्यात आले.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed