Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
२. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात यापुढे महापालिका आयुक्तांनी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ आणू नयेत. त्याचबरोबर पोलिसांनी दौऱ्यादरम्यान मानवंदना ठेवू नये, असे स्पष्ट आदेश गुरुवारी मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंदर्भात स्पष्ट आदेश मुख्यमंत्री कार्यालयाकडून गुरुवारी देण्यात आले आहेत.
३. सातरस्ता परिसरातील रिषभ ज्वेलर्समध्ये शिरून दोन कोटी रुपये किंमतीच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी मध्य प्रदेश येथून विनोद पाल आणि संतोष कुमार या दोघांना शोधून काढले. विनोद आणि संतोष यांच्यावर मध्य प्रदेशमध्ये गुन्हे दाखल असून तुरुंगात असताना दोघांची ओळख झाली आणि लुटीचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. लुटीचे सोने त्यांच्याकडून जप्त करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बातमी वाचा सविस्तर…
४. मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणावर महाराष्ट्रातच कान पकडून माफी मागण्याची वेळ आली. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगणाऱ्या तरुणाला स्थानिकांनी घेराव घातला, आणि उलट हिंदीत बोलण्याचा हेका धरला. अखेर तरुणाने ‘मुझसे गलती हो गयी, मुझे माफ कर दो’ असं म्हटलं. या प्रकरणाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले असून मराठी भाषिकांनी संताप व्यक्त केला आहे. बातमी वाचा सविस्तर…
५. कॅबिनेट मंत्रीमंडळाची स्थापना झाली, मात्र पालकमंत्री अद्यापही जाहीर झाले नाही. सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या पाच आमदारांपैकी एकाही आमदाराला मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही. त्यामुळे स्थानिक पालकमंत्री मिळण्याचा अपेक्षाभंग झाला आहे.
६. आई अरुणा लीलाधर डाखोळे (वय ४२, रा. खसाळा) यांची हत्या केल्यानंतर मुलगा उत्कर्ष (वय २४) हा टीव्ही बघायला लागला. काही वेळाने त्याचे वडील लीलाधर मन्साराम डाखोळे (वय ५०) घरी परतले. त्यानंतर त्याने वडिलांचीही चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याचे कपिलनगर पोलिसांच्या तपासात समोर आले.
७. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्या तिघा माजी नगरसेवकांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
८. रायगड येथील वीर रेल्वे स्टेशन समोरील फ्लाय ओव्हर पुलावर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. स्कॉर्पिओ क्रमांक MH 06 BE 4041 मधून महाड शहरातील आठजण महाड येथून लोणेरे येथे कॉफी पिण्यासाठी जात होते. त्यांच्या गाडीमधील डिझेल संपल्याने त्यांनी गाडी मुंबई-गोवा हायवेवर वीर रेल्वे स्टेशन समोरील फ्लायओव्हरवर थांबवली.
९. केंद्रीय आणि अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे पंतप्रधान मोदींनी एक चादर सुपूर्द केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट म्हणून देण्यासाठी ही चादर दिली आहे. त्यामुळे आता ही चादर घेऊन अल्पसंख्याक मंत्री आधी निजामुद्दीन औलियाच्या दर्ग्याला (३ जानेवारी) भेट देणार आहेत. मोदींनी भेट म्हणून दिलेली चादर प्रथम निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यात नेऊन मग अजमेर शरीफ दर्ग्यात नेली जाईल.
१०. बॉलिवूडमध्ये अनेक हिट आणि फ्लॉप प्रेमकथा आहेत. काही जोडप्यांची लग्न झाली तर काहींची प्रेमकहाणी अर्धवट राहिली. त्याचबरोबर काही स्टार्स असे आहेत ज्यांनी एकदा नव्हे तर अनेक वेळा लग्न केलं पण तरीही त्यांना खरं प्रेम मिळालं नाही. पण अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केलं आणि तिचं संपूर्ण आयुष्य त्याला समर्पित केलं. आज ही अभिनेत्री आई होण्यासोबतच सासूही बनली आहे. या अभिनेत्रीसाठी संसार म्हटलं की लग्न फार काळ टिकत नाही, पण तिचा प्रेमावर इतका विश्वास होता की आज लोक तिची उदाहरणे देतात. ती एक अशी अभिनेत्री आहे जिने हेमा मालिनी, श्रीदेवी, मौसमी आणि रेखा यांसारख्या अनेक सुंदरींशी स्पर्धा केलीये.