Digital Arrest Fraud : अलीकडे ‘डिजिटल अटक’ ही संकल्पना खूपच चर्चेत आली आहे. इतके की याची खुद्द पंतप्रधान मोदींनीही दखल घेत यापासून देशवासीयांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. पण आता पुन्हा यासंबंधीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
अलीकडे आपण अशा अनेक बातम्या वाचल्या असतील आणि याबाबतीत सतर्कता देखील बाळगत असालत. पण ही बातमी पाहिली तर तुम्हीही अवाक व्हाल, एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल येतो. पण कॉल उचलणारी व्यक्ती स्क्रीनवर दिसत नाही. पण समोरुन कॉल केलेला व्यक्ती पोलिस अधिकाऱ्याच्या वेषात दिसतोय. इथून कॉल उचलणाऱ्या व्यक्तीने कॉलचे उत्तर देताच, बोगस अधिकारी त्याला फोन स्क्रीनवर समोर येण्यास सांगतो.
Fact Check : बुरखा घालून तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ पुलवामाशी संबंधित? जाणून घ्या सत्य
पुढे अशाचप्रकारे तो बोगस माणूस आपली फसवेगिरी सुरुच ठेवतो आणि स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत राहतो. पण त्यानंतर स्थिती अचानक बदलते आणि कॉल उचलणाऱ्या व्यक्तीला तो बोगस पोलीस कॅमेऱ्यासमोर यायला सांगतो तेव्हा तो त्याचे कुत्रे त्या बोगस पोलिसाला दाखवतोय ‘ये लिजिए सर मै आगया सामने’ असे तो त्या पोलिसाला म्हणतो. बोगस पोलीस पुन्हा त्याला कॅमेऱ्यात चेहरा दाखवायला सांगतो. तेव्हा तो आपण कुत्रेच असल्याचे सांगतो आणि पुढे त्या पोलिसाला नकली वर्दी म्हणून सुनावतो. अरे ये रहा मै, अरे ठाणेदार. दिख रहा है क्या मै? अरे नकली वर्दी.’ असे म्हणत तो सुनावतो.
https://www.instagram.com/p/DDunffjBAZ5/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_againhttps://www.instagram.com/p/DDunffjBAZ5/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
पुढे त्या बोगस पोलिसाची एकच भंबेरी उडते आणि त्याला पुढे नाटक सुरु ठेवणे कठीण होतेय. त्याचा गेम आता ओव्हर होणार हे पाहून तो कॉल ठेवून देतो.