Nagpur Crime News : उपराजधानीत हत्येचे सत्र सुरू झाले आहे. भारतीय प्रोटेस्टेंट ख्रिश्चन कब्रस्थानमध्ये चाकूने गळा चिरुन कब्रस्थानच्या व्यवस्थापकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
वृत्तानुसार, शिंदे हे अविवाहित आहेत, ते कब्रस्तान परिसरातच नातेवाइकांसह राहत होते. वडिलाचे मित्र असल्याने एनॉन हा शिंदे यांना ओळखायचा. एक वर्षापूर्वी एनॉनच्या वडिलाचे निधन झाले होते.
वेब सीरिज पाहून रचला प्रेयसीच्या हत्येचा कट, फुटबॉल खेळाडूला पोलिसांनी केली अटक, शहरात खळबळ
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कब्रस्तानमध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू होते. यावेळी मोटारसायकलने एनॉन तेथे आला. त्याने बाहेर मोटारसायकल पार्क केली. तो आत गेला. शिंदे यांच्यासोबत बोलायला लागला. याचदरम्यान एनॉनने शिंदे यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. शिंदे यांनी आरडा-ओरड केली. एनॉन तेथून पळाला. तो मोटारसायकलजवळ गेला. नागरिकांनी पकडून त्याला चोप दिला. दरम्यान एका नागरिकाने जरीपटका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी एनॉनला अटक केली. जखमी शिंदे यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून शिंदे यांना मृत घोषित केले. शिंदे यांची हत्या का केली? याबाबत पोलिसांनी एनॉनला विचारणा केली, मात्र तो उडवा-उडवीची उत्तरे देत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

