मुंबई -गोवा महामार्गावर “बर्निंग बस “चा थरार
मुंबई वरुन मालवण कडे जाणार्या खापरोबा ट्रॅव्हल्स ची खाजगी आराम बस रात्री ११:३० वाजता रायगड कोलाड रेल्वे ब्रिज जवळ आल्यावर बसने अचानक पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला सुदैवाने सगळे प्रवासी सुखरूप बचावले आहेत. गाडीच्या मागील चाकांमधून धूर येत असल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ याची सूचना ड्रायव्हर याला केली. व गाडी तात्काळ रेल्वे ब्रिज जवळ उभी करून बस मधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. गाडीमध्ये सुमारे ३० प्रवासी व दोन चालक व एक क्लिनर असे होते.