Dharashiv Windmill Issue: बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता धाराशिव येथेही पवनचक्कीवरुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
हायलाइट्स:
- बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या
- धाराशिवमध्येही पवनचक्कीवरुन वाद
- ठेकेदारांकडून गावकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न
या गुंडांकडून पोलिसांच्या मदतीनेच गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यांना बळजबरीने गावात पवनचक्क्या उभारायच्या असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारही धाराशिव पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आल्याची माहिती आहे.
या ठेकेदारांच्या दहशतीने हे गावकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गावात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. बीडसारखी घटना धाराशिवमध्ये घडू नये, अशी भीती गावकऱ्यांना आहे.
“२९ तारखेला जगताप परिवार आणि तिथल्या सरपंचांनी मला फोन केला आणि सांगितलं की रेन्यू कंपनीचे काही लोक शेतात येऊन गोंधळ करत आहेत. तुम्ही लवकर या. मी पोहोचलो तेव्हा, १६ ते १७ काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ ५०-६० गुंड ज्यांच्या हातात चैन वगैरे होत्या. ते म्हणाले की कंपनीचे गुत्तेदार आहे. मी म्हटलं कंपनी, तुम्ही आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे. द्राक्षाच्या बागेत हे लोक गुंडगिरी करत होते. शेतकऱ्यांनी त्यांचा प्रयत्न हानून पाडला. तुम्ही कुठलेही असले तरी आम्ही तुम्हाला तुळजापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय करु देणार नाही”, अशी माहिती भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.

