आज मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इकडे राज्यभरात महायुतीचा जल्लोष सुरु असतानाच तिकडे सोलापूरमध्ये मात्र नव्या सरकारविरोधात EVM विरोधी संयुक्त कृती समितीकडून ‘ईव्हीएम हटाओ, संविधान बचाव’ आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर, कृती समितीचे अध्यक्ष उत्तम नवगिरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोठे, सुधीर खरटमल, कॉंग्रेसचे चेतन नरोटे तसेच हसीब नदाफ उपस्थित होते. यावेळी आंदोलक नेमके काय म्हणाले? पाहुया…