Pune Crime News: पुण्यातील नऱ्हे येथे एका २० वर्षीय तरुणाला उपसरपंचासह तिघांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेनंतर संबंधित तरुणावर उपचार सुरू होते.
समर्थ नेताजी भगत (वय: २० वर्षे, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी,अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एडिलेड कसोटीच्या आधी भारताला मिळाली गुड न्यूज; WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण झाले आणखी सोपे
आरोपी गौरव संजय कुटे (वय: २४ वर्षे) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय: २० वर्षे) राहुल सोमनाथ लोहार (वय: २३ वर्षे, सर्व राहणार मानाजीनगर, नऱ्हे) या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Historic Move: युक्रेनमध्ये होणार आणखी विध्वंस; पुतिन यांच्या निर्णयाने जगाचे टेन्शन पुन्हा वाढले, रशियाच्या लष्कराला…
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या ऑफीससमोर फिर्यादी यांचा मुलगा समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने ते दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत असताना आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजुन लाथा बुक्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने दोन्ही हातावर, पायावर, पार्श्व भागावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.