Ramtek Shiv Sena Ashish Jaiswal vs Shiv Sena UBT Vishal Barbate Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीकडून आशिष जयस्वाल आणि मविआकडून विशाल बरबटे यांच्यात चुरशीची लढत असून विधानसभेचा गड कोण राखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Ramtek Assembly Election Result 2024: आशिष जयस्वाल, विषाल बरबटे आणि राजेंद्र मुळक कोण मारणार बाजी?
रामटेक येथे ठाकरेंच्या शिवसेना गटाने विशाल बरबटे यांना तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल आणि मविआचे विशाल बरबटे यांच्यापैकी रामटेकच्या विधानसभेचा गड कोण राखणार, हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.
आशिष जयस्वाल ३८६ मतांनी आघाडीवर तर अपक्ष नेते राजेंद्र मुळक पिछाडीवर. चौथ्या फेरीत आशिष जयस्वाल १५४३ मतांनी आघाडीवर. पाचव्या फेरीत आशिष जयस्वाल २३९९ मतांनी आघाडीवर तर राजेंद्र मुळक पिछाडीवर. सहाव्या फेरीत आशिष जयस्वाल ३३०२ मतांनी आघाडीवर. सातव्या फेरती आशिष जयस्वाल ४०१४ मतांनी आघाडीवर तर अपक्षाचे राजेंद्र मुळक पिछाडीवर. आठव्या फेरीत आशिष जयस्वाल ५५२० मतांनी आघाडीवर. नवव्या फेरीत आशिष जयस्वाल ६९६३ मतांनी आघाडीवर. १० व्या फेरीत ८३५१ मतांनी आशिष जयस्वाल आघाडीवर.
११ व्या फेरीत आशिष जयस्वाल १०३३८ मतांनी आघाडीवर.