• Mon. Nov 18th, 2024
    आधी पुरावा दाखवा, तर मी उमेदवारी मागे घेणार, दिलीप वळसे पाटलांचे ओपन चॅलेंज

    Dilip Walse Patil Challenge to Devdatta Nikam: शरद पवारांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. तर शरद पवार पक्षातून देखील दिलीप वळसे पाटील यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यावरुन आता वळसे पाटील यांनीही भूमिका मांडत थेट आव्हानच दिले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : महाराष्ट्रातील दोन पक्षात फूट पडल्याने यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रचारात एकमेकांवर जोरदार वार-प्रहार करण्यात आले आहे. यातच शरद पवारांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. तर शरद पवार पक्षातून देखील दिलीप वळसे पाटील यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यावरुन आता वळसे पाटील यांनीही भूमिका मांडत थेट आव्हानच दिले आहे. ‘काही लोक म्हणतात मला ईडी, सीबीआयची नोटिस आली. यांसंदर्भातील काही पुरावा दिला तर माझी उमेदवारी मागे घेणार, असे वळसे पाटलांनी स्पष्ट केले.

    दिलीप वळसे पाटील यांनी आज आंबेगाव पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, काही लोक म्हणतात मला अटक होणार होती, काही म्हणतात ईडी आणि सीबीआयची नोटीस आली होती. म्हणून त्यांनी शरद पवारांना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. मात्र मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणी त्या संदर्भातील पुरावा आज रात्री नऊ वाजेपर्यंत आणून दिला, तर मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेणार, असं चॅलेंज वळसे पाटील यांनी दिले.
    आपल्याकडून चूक होऊ देऊ नका, कोणी दबाव आणला तर अजित पवार तुमच्या पाठीशी; शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टीका टाळत दादांचा सेफ गेम
    वळसे पाटील पुढे म्हणाले, माझ्यावर आरोप होत आहेत. पण मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. निकमांची नार्को टेस्ट केली तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. विरोधक म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, बिनधास्त करा. पण माझी ही करा अन् देवदत्त निकमांची ही नार्को टेस्ट करा. तसे झाले तर तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.

    राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांसोबत सत्तेत सामील झाले. यामुळे आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. वळसे पाटील यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी मोठी फिल्डींग लावली असल्याचे चित्र आहे. तर वळसे पाटील पाटलांची मतदारसंघावर मजबूत पकड असल्याने यंदाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. यातच शरद पवारांनी सभेतून वळसे पाटलांना पाडण्याचे आवाहन केल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.

    यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी थेट प्रतिस्पर्धी उमेदवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आता विरोधक म्हणाले महिला असुरक्षित आहेत, मग करू ना आपण सगळी चौकशी. बदलापूर पासून ते नागापूरपर्यंत सगळी चौकशी झाली पाहिजे. यांना (देवदत्त निकम) गावातील एक पतसंस्था चालवता आली नाही आणि हे विधानसभा, राज्य चालवायची भाषा करत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed