Ajit Pawar VS Sharad Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघ राज्यात खास चर्चेत आहे. काका आणि पुतण्यामध्ये चुरशीची लढत असून आता मतदार कोणाला विजयी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादीची फूट बारामतीकरांनाही मोठी अडचणीत टाकणारी ठरते आहे. दोन्ही पवार जवळचेच असल्याने मतदान कोणाला करायचे हा मोठा प्रश्न बारामतीकरांपुढे उभा आहे. त्यातून त्यांना योग्य उमेदवार निवडून मतदान करावे लागणार आहे. यात विशेष बाब अशी की, राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली तेव्हा शरद पवार गटाकडे बारामतीत पदाधिकारी – कार्यकर्तेही नव्हते. ना स्वतःचे कार्यालय होते. तरीही गेल्या दीड वर्षात त्यांनी ज्या गतीने पक्ष बांधणी करत तालुक्यात मुसंडी मारली ती उल्लेखनीय बाब आहे. विशेष म्हणजे फक्त मुसंडीच मारलेली नाही तर खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीत दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे आणि त्यांच्या या विजयात बारामतीच्या ४८ हजारांच्या मताधिक्याचा वाटा राहिला आहे.
बंटी पाटलांसारखं वागायला लागलो, तर काँग्रेस सोडून जिल्ह्यात अन्य पक्ष राहणार नाहीत, विश्वजीत कदमांनी शरद पवारांच्या शिलेदाराला घेरले
लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी स्थिती मतदार बोलून दाखवत आहेत. प्रत्यक्षात ती अमलात येईल का हे निवडणूक निकालातूनच स्पष्ट होईल. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार हे सहजासहजी अजित पवार यांना ही जागा मिळू देणार नाहीत, हे ही तितकेच खरे आहे. अवघ्या सहा महिन्यात युगेंद्र यांनी तालुका पिंजून काढला. विविध स्तरांवर नागरिकांशी संवाद वाढवला. याउलट १९८४ पासून अजित पवार हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या बारामतीशी जोडले गेले आहेत. १९९१ पासून तर ते इथले लोकप्रतिनिधीच आहेत. पवार कुटुंबात कोणाचाच नसेल एवढा दांडगा जनसंपर्क त्यांचा तालुक्यात आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणात गेल्यावर राज्याची आणि बारामतीची जबाबदारी अजित पवार यांच्याकडेच होती. त्यातून त्यांनी बारामतीत आपले मजबूत नेटवर्क निर्माण केले आहे. परंतु हे नेटवर्क लोकसभेवेळी त्यांच्या उपयोगी पडल्याचे दिसून येत नाही.
Ajit Pawar : पवार साहेबांचे भले मोठे फलक लावले, निवडणुकीत साहेब उभे आहेत का? अजितदादांचा सवाल, भावनिक होऊ नका; दादांचं आवाहन
गेला महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने पवार कुटुंबातील अनेक बाबी दोन्ही बाजूंनी समोर आल्या आहेत. बारामतीचे सात वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि राज्यात पाच वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेल्या अजित पवार यांना बारामतीसाठी अधिक वेळ द्यावा लागला. या उलट शरद पवार यांनी तालुक्यासाठी एकच दिवस दिला. अजित पवार हे रोज तालुक्यात दोन-तीन गावांना भेटी देत आहेत. दिवाळीत सलग तीन दिवस त्यांनी तालुका पिंजून काढला आहे. त्यांच्या ताब्यातील साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बाजार समिती आणि अन्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. अजित पवार यांच्या पक्षाची बारामतीत कागदोपत्री अधिक ताकद दिसते आहे. लोकसभेवेळी सुद्धी ती दिसून येत होती. परंतु मतदार हाच लोकशाहीत अंतिम निर्णय घेणारा असतो, याची चुणूक त्या निवडणुकीने दाखवून दिली.
बारामतीत काकांची सरशी की पुतण्याची बाजी? काकांनी जोर लावल्याने पुतण्याला फुटणार घाम? काय सांगते स्थिती
आता या कौटुंबिक लढाईत अजित पवार यांचा विकासाचा मुद्दा लोकांना भावतो की शरद पवार यांचे भावनिक आवाहन भावते हे निवडणूक निकालातून दिसून येईल. अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवानंतर कोणतीही कसूर ठेवलेली नाही. सगळी यंत्रणा त्यांनी कामाला लावली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. मतदानाला अजून तीन दिवसांचा अवकाश आहे. या तीन दिवसात बारामतीत काय घडामोडी घडतात, यावर निवडणूक निकाल अवलंबून असेल.