Eknath Shinde: आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील तसाच सूर आळवला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर निशाणा साधला. फोडा आणि राज्य करा हेच काँग्रेसचं धोरण आहे. राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट कधी म्हणणार, असा सवाल शिंदेंनी विचारला. मी माझ्या पक्षाची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, असं बाळासाहेब म्हणायचे. पण उद्धव ठाकरे स्वार्थासाठी, मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेससोबत गेले. ते केवळ खुर्चीसाठी तिकडे गेले. त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असा विचार त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर तोफ डागली.
AB फॉर्मसाठी शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवलं; आता पक्षानं वाऱ्यावर सोडलं; उमेदवाराला जबर धक्का
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ घोषणेचं समर्थन केलं. राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त केलेलं विधान चांगलं आहे. पण त्यांच्या मनात शिवसेनेबद्दल काय भावना आहेत, त्या माहीत नाहीत. त्यांच्याच हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून दाखवावं, असं थेट आव्हानच शिंदेंनी दिलं.
Pratibha Pawar: शरद पवारांच्या पत्नीला बारामती टेक्सस्टाईल पार्क बाहेर रोखलं; मिसेस पवारांचा सॉल्लिड सवाल
बाळासाहेब ठाकरे आज हृयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना जंगलात वाईल्ड लाईफचे फोटो काढायला पाठवलं असतं, असा टोला शिंदेंनी लगावला. ‘तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देऊ असा शब्द भाजपकडून आम्हाला देण्यात आलेला होता. पण ठाकरे त्याआधीच मुख्यमंत्री झाले. निकाल लागताच त्यांना आकडे समजले. आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे समजताच त्यांनी परिस्थितीचा पूर्ण फायदा उचलला. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि सत्तेत जाऊन बसले,’ अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली.