• Mon. Sep 7th, 2026

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Nov 12, 2024
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

| 12 Nov 2024, 8:52 am

Latest Marathi Breaking News Live Today: विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपण्यासाठी काही दिवस बाकी राहिले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सभांचा धुरळा उडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचारसभा आणि एक रोड शो पार पडणार आहे. याशिवाय अमित शहा यांची मुंबईत तर राहुल गांधी यांची विदर्भात सभा पार पडणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलात संध्याकाळी राहुल गांधी तर मोदींची पहिली प्रचारसभा दुपारी १२ वाजता चिमूरमध्ये त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पुण्यात मोदींचा रोड शो होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सभा घेतल्यानंतर आता भाजप नेते अमित शहा मुंबईत भाजप उमेदवारांसाठी दोन सभा घेणार आहेत. शहा यांची पहिली प्रचारसभा संध्याकाळी सहा वाजता घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान येथे होईल. तर दुसरी सभा कांदिवलीच्या कमलाविहार स्पोर्ट्स क्लबसमोर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed