• Sat. Sep 21st, 2024
धैर्यशील मोहिते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, शरद पवारांच्या उपस्थितीत माढ्यातून अर्ज भरणार

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याविरोधात दोन हात करतील. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बाळदादा मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील हेच शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्य प्रवेश करतील. गेल्या तीन आठवड्यांपासून मोहिते पाटील-पवार यांच्यात गाठीभेटी होत होत्या. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते पाटील करत होते पण भाजपने तशी कोणतीही पावले उचलली नसल्याने अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.
माढा लोकसभा उमेदवारीबाबत फलटणकर आणि अकलूजकरांनी निर्णय घ्यावा, शरद पवार यांचा निरोप

अकलूजच्या मोहिते पाटलांना फलटणच्या नाईक निंबाळकरांची साथ लाभणार

सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यांना फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर तसेच संजीवराजे नाईक निंबाळकरांची बहुमुल्य साथ लाभणार असल्याची चर्चा आहे.

रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करण्याची मानसिकता नाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी

भाजपकडून मोहिते पाटलांच्या बंडखोरीकडे दुर्लक्ष

माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, फलटण आणि माण-खटाव हे तालुके येतात. या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांनी बंडखोरी केली, तरी रणजितसिंह निंबाळकर यांना फारसा फरक पडणार नाही, असे चित्र आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांना भेटून भाजप नेत्यांनी चर्चा केली; परंतु त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांना आता भेटणे बंद केले आहे. त्यामुळेच मोहिते पाटील गटाने पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाण्यासंबंधीचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed