• Fri. Nov 15th, 2024

    महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ अंतिम निकाल जाहीर

    ByMH LIVE NEWS

    Apr 2, 2024
    महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ अंतिम निकाल जाहीर

    मुंबई, दि.२: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 20 ते 23 फेब्रुवारी,२०२४आणि २६ते २८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२२ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे.

    या परीक्षेमध्ये नाशिक जिल्हयातील ओंकार संजय निकुंभ हे खुला व मागास वर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील श्रीमती स्वप्नाली संजय तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

    उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण(Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

    प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त , शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed