काय होतं प्रकरण?
चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेत ऑक्टोबर २०१९ नंतर अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही भरती करताना उमेदवारांकडून प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र मागवण्यात आलं होतं. पण, हे प्रमाणपत्र अनेकांनी सदोष सादर केलं होतं. त्यात तांत्रिक त्रुटी होत्या, असं असतानाही २४ उमेदवारांची भरती करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेचे नेते संदीप गड्डमवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत बँकेची फसवणूक करण्यात आल्याचं म्हटलं गेलं होतं. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भांदवी ४२०, ४७१, ३७ अन्वये अध्यक्ष पाऊणकर आणि सरव्यवस्थापक एस. एन. दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
कुणाला किती फायदा
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार असे चित्र निर्माण झाले होते. या मतदारसंघातील जातीय समीकरणाचा प्रभाव बघता वंचितने राजेश बेले यांना उमेदवारी देऊन तिहेरी लढतीची शक्यता निर्माण केली आहे. भाजपाकडे प्रभावी ओबीसी चेहरा नाही, ही कमतरता देवतळे, पाऊणकर भरून काढतील का? की लाभापेक्षा नुकसान अधिक ठरेल,अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.