• Sat. Sep 21st, 2024

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.सदाहारी (वय ४२,बदललेले नाव) याने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.सदाहारी हा विवाहित आहे. त्याला दोन अपत्ये आहेत. जानेवारी महिन्यात तो मनीषनगर परिसरातील एका इमारतीमध्ये काम करीत होता. सायबर गुन्हेगाराने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. अंकिता बोला असल्याचे सांगून मी लव्हर्स वर्ल्ड नावाच्या मार्व्हलस सेक्युरिटी सर्व्हिसमध्ये काम करते. कंपनीकडून एक्सॉर्ट सर्व्हिस देण्यात येते. तुम्ही जिगोलो बनल्यास मोठी कमाई होईल,असे आमिष तिने सदाहारी याला दिले. तिच्या आमिषाला सदाहारी बळी पडला.
निवडणूक रोख्यांचा तपशील देण्यास राजकीय पक्षांचा नकार, राष्ट्रवादी-तृणमूलने काय सांगितलं?

नोंदणीसाठी सदाहारीने तिने पाठविलेल्या क्युआर कोडवरून ८५० रुपये जमा केले. त्यानंतर विविध कारणे सांगून त्याला पैशाची मागणी सुरू केली. सदाहारी याने पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले. त्याने सायबर गुन्हेगारांच्या खात्यात एकूण चार लाख ८२ हजार रुपये जमा केले. मात्र त्याला काम मिळाले नाही व पैसेही परत मिळाले नाही. फसवणूक झाल्याने त्याने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed