• Mon. Nov 25th, 2024
    शिंदे गटाच्या आमदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मराठा आरक्षणावरून दगडफेक केल्याचा संशय

    नांदेड: शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार बालाजी कल्याणकर हे एका विवाह सोहळ्याला गेले असता तिथे अज्ञातांनी दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्याचे समो आले आहे. रविवारी दुपारी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा गावात ही घटना घडली. मराठा आरक्षण आणि सगेसोयरेची अंमल बजावणी होतं नसल्याने मराठा आंदोलकानी आमदारांच्या गाडीवर दगडफेक केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेने अर्धापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
    ठाकरेंचा विश्वासू शिलेदार, आदिवासींचा चेहरा म्हणून ओळख; आमदार आमश्या पाडवी शिंदे गटात
    मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील देगांव कुराडा गावात रविवारी विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्याला नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे गेले होते. मंडपाच्या प्रवेश द्वाराजवळ गाडी पार्किंग करून आमदार कल्याणकर हे वधू वरांना भेटण्यासाठी गेले. यावेळी थोड्याचं वेळात काही अज्ञातांनी वाहनावर दगडफेक करून काचा फोडल्या. सुदैवाने गाडीजवळ कोणी नसल्याने यात कोणाला जीवितहानी झाली नाही, पण वाहनाचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर गावात काही वेळ तणाव देखील निर्माण झाला होता.

    तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्याची पवार समर्थकानं खास चांदीची टोपी बनवली

    दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मराठा आरक्षणावरून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाहनावर दगदफेक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डेची गाडी फोडण्यात आली होती. शिवाय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाहनावर देखील दगडफेक करण्यात आली होती. मराठा आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी होतं नसल्याने मराठा आंदोलक लोक प्रतिनिधीवर नाराज असल्याचे दिसून येतं आहे. दरम्यान गावाबंदीचे बॅनर नंतर आता मराठा बांधवाकडून घराच्या दारावर आता पोस्टर लावले जात आहेत. अगोदर ओबीसीतून मराठा आरक्षण नंतर इलेक्शन” अशा आशयाचे पोस्टर घराच्या दारावर लावले जात आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *