• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यातून उमेदवारीवर देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, वाचा नेमकं काय म्हणाले?

    पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नेत्यांचे सातत्याने दौरे सुरूच आहे. त्या अनुषंगाने पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असल्यामुळे भाजपला तगडा उमेदवार देण्याची चाचपणी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते करत आहे. कसबा विधानसभा निवडणूकमध्ये हाती प्रभाव आल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते लोकसभा लढवतील, अशी चर्चा होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नावही चर्चेत आलं होतं. मात्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
    जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार, ‘या’ उमेदवारांच्या नावाची चर्चा, प्लॅन बी ही तयारउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा होता. भांडारकर ओरियांटल रिसर्ज सेंटर येथे नियोजित कार्यक्रम होता. त्या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाची सांगता करत होते. या दरम्यान त्यांनी आपल्या उमेदवारीचा खुलासा केला. कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या रोड हायवेच्या कामाबाबत सांगत होते. फडणवीस म्हणाले, गडकरी साहेब आणि आम्ही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एक करार केला. यामध्ये पुणे ते संभाजीनगर व्हाया अहमदनगर असा आम्ही एक ग्रीनफिलिड रोड तयार करतोय. की जो पुणे रिंग रोडवरून सुरू होऊन व्हाया संभाजीनगर अहमदनगरला जाईल. पुणे ते संभाजीनगर या रोडमुळे अंतर दोन तासात गाठता येईल.

    एकेकाळी भंगार गोळा करणाऱ्या मुलीला नवी उमेद दिली, ‘मस्ती की पाठशाला’नं आयुष्य बदललं

    ते पुढे म्हणाले की, म्हणजे मी पण पुण्याच्या जवळ जास्त येण्याचा प्रयत्न करतोय. पण मी पुण्यातून निवडणूक लढवणार नाही, असं म्हणताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. परंतु पुण्यातील इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला. दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेट विधानसभामध्ये पोट निवडणूक जाहीर झाली होती. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या रासनेंचा पराभव करून भाजपचा गड काबीज केला होता. यानंतर खासदार गिरीश बापट यांचे देखील निधन झाले होते. मात्र त्या ठिकाणी पोटनिवडणूक न लागता थेट लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहेत. म्हणून तीच परिस्थिती पुन्हा वाट्याला येऊ नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची लोकसभेबाबत चर्चा होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर होतं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *