नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासाला चालना देण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात ५७० कोटींची तरतूद करून ‘नैना’च्या विकासाला सिडकोने प्राधान्य दिल्याचे दाखवून दिले आहे. या क्षेत्रातील काही शेतकरी, जमीनमालक व विकासक सिडकोने जमीन हस्तांतरणासाठी ४०:६०च्या प्रमाणाचा दिलेला प्रस्ताव मान्य करत नसले तरी लवकरच सिडको नगर योजना क्र. २ व ३ परिसरातील विकासकामांसाठी तब्बल ३५० ते ४०० कोटींच्या निविदा काढणार आहे.नैना क्षेत्राच्या विकासाला झालेली दिरंगाई लक्षात घेऊन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी एक पाऊल पुढे टाकून नैना क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिल्याचे दिसून येते. नैना क्षेत्रातील ८० गावे ही आता तिसऱ्या मुंबईची उभारणी करणाऱ्या एमएमआरडीएकडे हस्तांतरित झाल्यामुळे सिडकोकडे आता ‘नैना’तील ९४ गावांच्या विकासाची जबाबदारी राहिली आहे. पहिल्या टप्प्यात नैनातील २३ गावांच्या विकासाचे लक्ष्य नगररचना परियोजनांद्वारे (टीपीएस) सिडकोने नजरेसमोर ठेवले आहे. त्यासाठी ११ टीपी स्कीमचे नियोजन सिडकोने केले असून तीन नगररचना परियोजनांना राज्य सरकारने मंजुरी दिली असून परियोजना क्र. ४, ५, ६, ७, ९ व १० अशा सहा नगररचना परियोजना सरकारकडे मंजुरीसाठी पाठवल्या आहेत.
‘नैना’च्या पहिल्या नगररचना परियोजनेचे क्षेत्र साधारणत: ५० एकरच्या आसपास असल्याने या क्षेत्रातील रस्ते, गटारे, नाले, पदपथ आदी पायाभूत सुविधांवर सिडकोने सुमारे ११ कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र सरकारने मंजूर केलेल्या परियोजना क्र. २ व ३ च्या क्षेत्रात सिडको पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी तब्बल ३५० ते ४०० कोटी रुपये खर्च करणार आहे. या विकासकामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिली.