• Sat. Sep 21st, 2024
मटण आणण्यासाठी बाजारात गेले, टर्नवर ट्र्रॅक्टरची बाईकला जोरदार धडक, मामा-भाच्याचा जागीच अंत

नांदेड : ऊसतोडीचे काम करून मटण आणण्यासाठी दुचाकीवर जात असलेल्या मामा भाच्यावर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाला किरकोळ मार लागला आहे. मुदखेड तालुक्यातील वळण रस्त्यावर २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. रोहिदास चव्हाण आणि विजय पवार, असे मृतांची नावे आहेत. या घटनेने मुदखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.रोहिदास चव्हाण (रा. पांगरगाव तांडा ता. मुदखेड) आणि विजय पवार (रा. सिंधी तांडा ता. उमरी) हे दोघे नात्याने मामा भाचे आहेत. आपल्या कुटुंबियांसोबत ते ऊसतोडीचे काम करत होते. दिवसभर ऊसतोडीचे काम केल्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७च्या सुमारास रोहिदास चव्हाण, विजय पवार आणि इतर एक असे तिघे जण दुचाकीवर मटण आणण्यासाठी जात होते. मुदखेड शहरातील सीता नदीच्या वळण रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरची जोरदार धडक लागली. या अपघातात ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने विजय पवार याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला तर रोहिदास चव्हाण याला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपची पहिली यादी जाहीर, १९५ उमेदवारांची घोषणा; महाराष्ट्रातून एकही उमेदवाराची घोषणा नाही
या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मयत विवाहित असून त्यांना तीन लहान मुले आहेत. अपघातात मामा भाच्याचा मृत्यू झाल्याने पांगरीगाव तांडा आणि सिंधीगावात शोककळा पसरली आहे. दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या वळण रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु आहे. भरधाव वेगाने वाहनं चालवले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed