• Mon. Nov 25th, 2024
    मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटमध्ये मोठा बदल

    नवी मुंबई : मुंबईच्या दिशेला येणाऱ्या मार्गीकेवर नवीन टनेल झाला असल्याने मार्गात बदल करण्यात आले आहेत. घाट उतरताना पुर्वी खोपोलीतून एक्झिट घेण्यासाठी डाव्या बाजूने उतरावे लागत होते. तर मुंबईला येण्यासाठी उजव्या बाजूची मार्गिका होती. आता नेमके उलटे करण्यात आले असून मुंबईला येण्यासाठी डाव्या बाजूने तर खोपोली जाण्यासाठी उजव्या बाजूने जावे लागत आहे.खोपोली एक्झिट मार्गिकेत बदल केला असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रमाव्यस्था निर्माण होवू नये यासाठी चार ते पाच किमी आधीपासून सुचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच स्पिकरवरूनसुध्दा सुचना दिली जात आहे.
    अजितदादांच्या भूमिकेची ‘बारामतीकरां’कडून चिरफाड, व्हायरल पत्रावर रोहित पवारांचे बाबा म्हणतात…

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल

    यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी.
    या वाहतूकीच्या बदलामुळे द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असंही सांगण्यात आलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *