पुणे: कोणत्याही वस्तूची एक्सपायरी झाल्यानंतर त्यांचा वापर करणे टाळायला हवे. मात्र काही विक्रेत्यांकडून मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकले जातात. पुण्यातील कात्रज परिसरामध्ये असणाऱ्या बेकरीतील आईस्क्रीम खाऊन विषबाधा झाल्याचा आरोप करत कात्रज परिसरात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यानी बेकरी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या महितीनुसार, कात्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या क्वालिटी बेकरीमध्ये एका लहान मुलाने आईस्कीम खाल्यानंतर विषबाधा झाल्याचा दावा बेकरी फोडणाऱ्या धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी आठ ते दहा कार्यकर्त्यांनी क्वालिटी बेकरीमध्ये जात मालकाला जाब विचारला. तसेच बेकरीची तोडफोड केली.

दरम्यान, या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. संबंधित बेकरी चालकावर कार्यवाही करण्याची मागणी धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.