• Sat. Sep 21st, 2024

बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडले, अकोला पोलिसांकडून तरुणाला पुण्यातून अटक

बिश्नोई टोळीच्या संपर्कात असल्याचे पुरावे सापडले, अकोला पोलिसांकडून तरुणाला पुण्यातून अटक

अकोला : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी गजाआड केलं आहे. २५ वर्षीय शुभम लोणकर आणि इतर दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्टलसह ९ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारीला देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं होतं. २७ वर्षीय अजय तुकाराम देठे आणि २५ वर्षीय प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे उघड झालेत.

अजय आणि प्रफुल्लं या दोघांनी काही दिवसांपूर्वी शुभमनं सांगितल्याप्रमाणे दोन व्यक्तींकडून पार्सल घेतलं. हे पार्सल देशी पिस्टलचं होतं. दोघांनाही याबाबात काहीही कल्पना नव्हती, घरी नेल्यानंतर त्यांनी पार्सल ओपन केलं अन् थेट त्यामध्ये दोन पिस्टल दिसल्या, तेव्हा दोघेही घाबरले. दोघांनीही शुभमला वेळोवेळी फोन करूनही तो पार्सल नेण्यासाठी आला नाही. ही बातमी सर्वत्र पसरली आणि पोलिसांपर्यत पोहोचली. ज्याने पिस्टल मागवली होती तो शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी आहे. शुभम हा गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वारजे भागात वास्तव्यास आहे. अखेर अकोला पोलिसांनी शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यापूर्वी त्याचा उज्जैन मध्यप्रदेश येथे शोध घेतला होता तेव्हा तो तिथून पसार झाला होता. त्यानंतर त्यास भालेकर वस्ती, वारजे, पुणे शहरातून अटक केली आहे.
दोन लेकरांचा बाप प्रेयसीसोबत रेल्वे रुळांवर; उडी घेत आयुष्य संपवलं अन् मग अकल्पित घडलं

बिश्नोई टोळीच्या संपर्कात?

शुभम लोणकर हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारखा दिसणारा व्यक्ती आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात होता, त्यां दोघांच्या संपर्काचे अनेक व्हिडिओ कॉल रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले. दुबई, इंटरनॅशनलमधील गुन्हेगारासोबत शुभमचा संपर्क होता हे दाखवणारे फोन कॉल समोर आले आहेत, अशी माहिती अकोला पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. विशेष म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तुरुंगात आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की गॅगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणा-या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे सोबत ऑडिओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन अकोट शहर व स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
कोथूळ हत्या प्रकरण; अखेर ‘त्या’ प्रकरणाचा छडा, घरचाच व्यक्ती निघाला मास्टरमाइंड, वाचा नेमकं प्रकरण
ही कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, अनमोल मित्तल सहायक पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, पोलीस स्टेशन अकोट शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेश जवरे, मनीष कुलट, गोपाल जाधव , चंद्रप्रकाश सोळंके, विशाल हिवरे,रवि सदांशिव यांनी केली आहे.
मराठा आंदोलनावेळी अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तास गैरहजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे निलंबित

मी जिवंत आहे…. पूनम पांडेंकडून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed