सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : कामगार आणि त्यांच्या पाल्यांना विविध खेळ व स्पर्धांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका कामगार विभागाची आहे. त्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभा आहे. कामगार केसरी व कुमार केसरी स्पर्धेसाठी असलेली फिरती गदा यावर्षीपासून कायमस्वरुपी विजेत्याजवळ राहील, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, आमदार गोपिचंद पडळकर, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, सहायक कामगार कल्याण आयुक्त माधवी सोळवे, कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर, कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, बाबाराजे महाडिक, पृथ्वीराज पवार आदि उपस्थित होते.
कामगार विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळपास 237 कुस्तीपटुंनी सहभाग घेतला असल्याचे सांगून कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कामगार आणि कामगारांच्या पाल्यांना विविध खेळांसाठी व स्पर्धांसाठी शासनाकडून मदत करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून कामगार केसरी व कुमार केसरी विजेत्या कुस्तीपटुंसाठी महाराष्ट्र केसरी विजेत्यांसाठी असलेल्या शासनाच्या सर्व सोयी-सुविधा सुरु करण्यासाठीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येणार आहे. तसेच कामगार किंवा कामगाराचा पाल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होत असेल तर त्याच्या खर्चासाठी कामगार विभाग त्याला मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे कुमार केसरी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नरसिंह रंगराव पाटील, कुंभी कासारी, द्वितीय क्रमांक प्रथमेश जाधव, कुंभी कासारी, तृतीय क्रमांक अजित मल्लाप्पा कुद्रेमणकर, इमारत बांधकाम कोल्हापूर, उत्तेजनार्थ अविराज धनाजी माने, सदगुरु साखर कारखाना, कुडुस.
कामगार केसरी स्पर्धा प्रथम क्रमांक मुंतजीर सरनोबत, धाराशिव, द्वितीय क्रमांक नाथा पवार, उत्कर्ष भोजनालय, सांगली, तृतीय युवराज धर्मराज चव्हाण, विठ्ठल कार्पोरेशन लि, महेशगाव, उत्तेजनार्थ अंकुश ईश्वर माने, क्रांतिअग्रणी कुंडल.
गट पहिला 57 किलो – प्रथम क्रमांक विनायक विष्णू रावण, कुंभी कासारी, द्वितीय क्रमांक अमित दाजी साळवी, दुधगंगा-वेदगंगा बिद्री, तृतीय क्रमांक निनाद मोहन बडरे, बाबासाहेब मिल आटपाडी, उत्तेजनार्थ स्वप्नील भिमराव शेलार, त्रिमुर्ती ग्रुप सातारा. गट दुसरा 61 किलो – प्रथम क्रमांक सुरज संभाजी अस्वले, दुधगंगा – वेदगंगा, द्वितीय क्रमांक रविंद्र संजय लोहार, श्री इंटरप्रायझेस कागल, तृतीय क्रमांक अतुल भिमराव चेचर, कुंभी कासारी, उत्तेजनार्थ वैभव नामदेव जाधव, ज्ञानेश्वरी सह. कारखाना अहमदनगर. गट तीसरा 65 किलो -प्रथम क्रमांक करणसिंह प्रकाश देसाई, कुंभी कासारी, द्वितीय क्रमांक अजय बाबासो कापडे, त्रिमुर्ती ग्रुप फलटण, तृतीय क्रमांक प्रतिक नामदेव साळुंखे, कुंभी – कासारी, उत्तेजनार्थ विश्वजीत सर्जेराव वाघ, इमारत बांधकाम सांगली. गट चौथा 70 किलो – प्रथम क्रमांक निलेश आब्बास हिरुगडे, दुधगंगा-वेदगंगा, द्वितीय क्रमांक संकेत सरदार पाटील, कुंभी-कासारी, तृतीय क्रमांक आकाश प्रभाकर कापडे, त्रिमुर्ती ग्रुप फलटण, उत्तेजनार्थ रोहण दशरथ पाटील, दुधगंगा – वेदगंगा, गट पाचवा 74 किलो – प्रथम क्रमांक ओंकार एकनाथ पाटील, कुंभी – कासारी, द्वितीय क्रमांक ओंकार रविंद्र फडतरे, म.रा.प. सातारा, तृतीय क्रमांक जय संदिप भांडवले, इमारत बांधकाम कागल, उत्तेजनार्थ किरण विष्णू राणे, श्री सदगुरु सा.का. राजेवाडी.
कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी निमंत्रित मान्यवर व उपस्थिताचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी समशेर कुरणे, प्रदीप कांबळे, संगिता खोत, विठ्ठल खोत, भारती चव्हाण हे उपस्थित होते.
00000