• Sat. Sep 21st, 2024
दुष्काळामुळे मोसंबी बागेचे नुकसान; तरीही हिंम्मत हरला नाही, दीड एकरावर पेरुची लागवड, लाखोंची कमाई

छत्रपती संभाजीनगर: अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाने मराठवाड्याचा शेतकरी होरपळला आहे. मात्र अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा दिला अन् दीड एकर शेतात ८०० तैवान जातीचे पेरूची झाडे लावली. त्यासाठी वर्षभर एकूण एक लाख रुपये खर्च केले. आता वर्षाला चार लाख रुपये उत्पन्न मिळाले. आणखी दोन लाख रुपये उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे.

मराठवाडा म्हटलं तर पाचवीला पुजलेला दुष्काळ. याच दुष्काळात होरपळणारा मराठवाड्यातील शेतकरी ही परिस्थिती वर्षानुवर्ष चालत आहे. मात्र यांचं परिस्थितीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील राजेंद्र हाके या शेतकऱ्याने मात तर केलीच पण कमालही करून दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आडगाव बुद्रुक हे राजेंद्र हाके यांचं गाव आहे. या गावात बहुतांशी शेतकरी शेती आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. राजेंद्र हाके यांना १० एकर शेती आहे. त्यांना एकुलती एक मुलगी असून पत्नी आणि राजेंद्र हाके हे शेती करतात.
ना कोणतं मार्गदर्शन ना आर्थिक सहाय्य; सेंद्रिय पद्धतीने भाजी पिकवण्याचा निर्धार, पडीक जमिनीवर शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
पारंपारिक शेतीसोबत त्यांनी मोसंबीची बाग शेतात लावली होती. मात्र पुरेसा पाऊस नसल्यामुळे ती बाग त्यांना नष्ट करावी लागेली. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा मोठा त्रास हा राजेंद्र हाके यांचं कुटुंबाला झाला. दरवर्षी निसर्गाची अनियमित्त मुळे कंटाळलेल्या हाके कुटुंबाने काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी आजूबाजूला माहिती घेतली. त्याचबरोबर कृषी अधिकारी यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतलं. यात त्यांना पेरूच्या फळबागाचा सल्ला मिळाला. त्यांनी दीड एकरमध्ये पेरूची बाग लावण्याचा ठरवलं.

यासाठी त्यांनी तैवान जातीचा पेरूची कलम विकत घेतली. चाळीस ते साठ रुपये प्रति नग प्रमाणे ८०० झाडे त्यांनी विकत घेऊन दीड एकर शेतीमध्ये लावली. यासाठी त्यांना वर्षभर संपूर्ण लाख रुपये खर्च आला. वर्षभर मशागत केल्यानंतर पेरूला चांगला भाव मिळाला असून आता राजेंद्र हाके यांना ४०० कॅरेट पेरू झाले आहेत. यातून त्यांना तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. त्याचबरोबर आणखी दोन लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. त्याचबरोबर आता हीच पेरूची झाडे राजेंद्र हाके यांना वर्षानुवर्ष उत्पन्न मिळवून देणार आहेत असं ते सांगतात.

फटाके, डान्स, मिठाईचं वाटप; मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला

पूर्वी आमच्याकडे मोसंबीच्या बाग होती. मात्र मोसंबी साठी पाऊस लागतो. यामुळे आम्ही मोसंबी बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यात मोठं नुकसान झालं. त्यानंतर पेरूची लागवड केली. पेरू बागेला पाणी देखील कमी लागतं. तसेच मेहनत देखील कमी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही या पेरूची लागवड केली. यावर्षी आम्हाला याच्यातून ४ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. आणखी २ लाख रुपयांचे उत्पन्न भेटेल अशी मला अपेक्षा आहे, असे शेतकरी राजेंद्र हाके यांनी सांगितले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला फाटा देणं आवश्यक आहे. आपल्या शेतीला पूरक असा व्यवसाय कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडावा. तसेच आपल्याकडे पुरेसा पाऊस मिळत नसल्यामुळे कमी पाण्यावर चांगलं उत्पन्न देणारे पिके घेण्यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. आम्ही पेरू लागवड केल्यामुळे आम्हाला चांगलं उत्पन्न मिळत आहे. त्याचबरोबर हेच झाड आता मला वर्षानुवर्ष उत्पन्न देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील असा विचार करण्याची गरज असल्यास ते सांगतात, असे श्रीकांत हाके यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed