• Sat. Sep 21st, 2024
मागण्या मान्य होईपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार, आशा सेविकांचे पालिकेत आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: आशा वर्कर्स, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात जोपर्यंत वाढ होत नाही; त्याचप्रमाणे अन्य मागण्यादेखील जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम राहणार आहे, असा इशारा देऊन आशा वर्कर्सनी महापालिकेत मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. द्वारसभादेखील आंदोलनाच्या वेळी घेण्यात आली. आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी युनियनतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांनी महापालिकेच्या अंतर्गत काम करताना एक महिन्यापासून ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. सरकारने कामाचा मोबदला वाढवून द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना निवेदन दिले. त्यानंतर पालिकेच्या प्रांगणात द्वारसभा घेत ठिय्या आंदोलन केले. या वेळी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका केली. महिलांचे प्रश्न सोडवण्याचे केवळ नाटक केले जात आहे. मोबदल्यात वाढ करण्याचा शासन निर्णय काढण्याची घोषणा महिनाभरापूर्वी करण्यात आली. अद्याप शासन निर्णय निघाला नाही. त्यामुळे सरकारवर विश्वास राहिलेला नाही. मुंबईत २९ जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन केले जाईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं

या आंदोलनात सुनीता जैस्वाल, अनिता दाभाडे, मंगल मोरे, मनोरमा रमंडवाल, हर्षा पवार, मीरा जाटवे, सुजाता धनेश्वर, ज्योती अवसरमल,जयश्री जाधव, सुनीता काळे,निता बोटके, अनिता ताठे, गंगोत्री सोनवणे, जयश्री चोरमारे, पल्लवी कुटे, रंजना तुरकमाने, सुनीता कामजळगे, माधवी पवार आदी उपस्थित होते.

आम्ही मागण्यांसाठी चाललोय, मुंबई बंद पाडायला नाही, ओबीसींना यायचं असेल तर येऊ दे | मनोज जरांगे पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed