मुंबई, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलुरु, कर्नाटक या संस्थेच्या संचालक डॉ. व्ही. भाग्यलक्ष्मी या राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर नुकत्याच आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सचिव श्री.भांगे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना याबाबतची सविस्तर माहिती सांगितली. तसेच चैत्यभुमी मुंबई, दिक्षाभुमी, नागपुर व बार्टी पुणे तसेच राज्यात विभागामार्फत विविध ठिकाणी चालू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.
यावेळी डॉ.व्ही.भाग्यलक्ष्मी यांनी श्री.भांगे यांचा कर्नाटक मधील पारंपरिक पद्धतीची वोड़ीयार राजघराण्याची पगडी देऊन सत्कार केला व पुस्तक भेट दिले. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.
००००
शैलजा पाटील/विसंअ/