• Sat. Sep 21st, 2024

जोडप्यावर जीवघेणा हल्ला, नंतर गाडीची तोडफोड अन् वादातून धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

जोडप्यावर जीवघेणा हल्ला, नंतर गाडीची तोडफोड अन् वादातून धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

डोंबिवली: ठाकुर्ली चोळेगाव परिसरात एका इमारतीत घडलेला भीषण प्रकार समोर आला आहे. तक्रारदार सदानंद सालियन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या इमारतीतील कुटुंबाने त्यांच्यासह पत्नीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. आरोपी कुटुंबाने सदानंद यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समजले आहे.
घरात पोलिसांची धाड, छाप्यात बंदुका बनवण्याचे साहित्य अन् तलवारींसह वाघनखांचा मोठा साठा जप्त, रायगडात खळबळ
तक्रारपत्रात समोर आलेल्या माहितीनुसार, सदानंद सालियन हे मागील १० वर्षांपासून या इमारतीत राहतात. अलीकडेच त्यांनी इमारतीचे सचिव पद स्वीकारले होते. मागील चार महिन्यांपासून इमारतीत पाण्याची अडचण जाणवत होती. यावरून ६ जानेवारीला इमारतीच्या टेरेसवर एक मीटिंग चालू होती. मीटिंगमध्ये सदानंद सालियन आणि उजाला अंकुश पाटील अशा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर सालियन यांच्यावर उजाला त्यांची पत्नी अमृता आणि भाऊ रोहित पाटील यांनी हल्ला करत मारहाण केली.

यावेळी सालियन यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर धावून जात अश्लील भाषेत शिवीगाळ केला गेला. तसेच सालियन दाम्पत्याला बिल्डिंगच्या जिन्यात ढकलून देत त्यांच्यावर विटा आणि लाकडी फ्रेम सुद्धा फेकण्यात आली. या हाणामारीदरम्यान सालियन यांच्या पत्नीस गंभीर दुखापत झाली असल्याची तक्रार सदानंद यांनी पोलिसांकडे केली आहे. हे प्रकरण ६ जानेवारी २०२४ रोजी घडले.

मोदींनी लक्षद्विपला जाऊन फोटोसेशन केलं आणि मालदीवच्या महागड्या पर्यटनाचं दुकान गोत्यात आलं

सालियन यांनी यासंदर्भात X खात्यावर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री शिंदेंसह पोलिसांना सुद्धा टॅग केले आहे. तक्रारपत्रात असणारा उल्लेख आणि सालियन यांच्या खात्यावर दिसणाऱ्या व्हिडीओनुसार, सालियन आपल्या पत्नीच्या उपचारासाठी त्यांना घेऊन दवाखान्यात गेले असता आरोपी पाटील कुटुंबाने सालियन यांच्या गाडीची सुद्धा तोडफोड केली. याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात रोहित पाटील, उजाला पाटील आणि अमृता पाटील यांच्यावर कलम ३५४ व ३२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed